जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ
यवतमाळ पाठोपाठ आता सांगलीतील उंटवाडी येथे विषारी कीटकनाशकाच्या फवारणीमुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. मारुती पाटोळे असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. यवतमाळमधील शेतकऱ्यांप्रमाणेच पाटोळे यांना फवारणी केल्यानंतर त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तुरीवर कीटीकनाशक फवारत असतांना नाकातोंडावाटे कीटकनाशक त्यांच्या शरीरात गेले होते. त्यांना उपचारासाठी मिरजमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मारुती यांचा मृत्यू झाल्याने जत तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.