जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली
राज्यात शेतकरी राजा हवाल दिल झाला असताना शेतकऱ्यांच्या संयमाचा उद्रेक झाला तसेच शेतकरी राजा संपावर गेला .कारण कर्जमाफी व शेतकर्या च्या मालाला मिळत नाही हमी भाव शेतकऱ्याचं जीवन सुरळीत व्हावं तो कर्जमुक्त व्हावा या करिता डोंबिवलीचा एक चाकरमानी अक्षय फाटक एका कंपनीत कामाला असलेला व्यवस्थापक याने मुख्यमंत्र्याला एक पत्र लिहिले.
डोंबीवलीच्या अक्षय फाटक यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शेतकऱी दत्तक योजना तयार केली. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहीलं. शासनाने या योजनेवर शिक्का मोर्तब करावा यासाठी ते पाठपूरावा करत आहेत.