Reel Star Rohini Paradhye Death: रील्समुळे घराघरात पोहोचली, स्वतःचा व्यवसायही उभा केला; पण हॉटेलच्या स्वयंपाकघरातच रोहिणीने संपवलं आयुष्य

मंगळवेढ्यातील प्रसिद्ध रीलस्टार रोहिणी पाराध्येचा स्वतःच्या हॉटेलच्या किचनमध्ये मृतदेह आढळून आला.

Reel Star Rohini Paradhye Death: रील्समुळे घराघरात पोहोचली, स्वतःचा व्यवसायही उभा केला; पण हॉटेलच्या स्वयंपाकघरातच रोहिणीने संपवलं आयुष्य

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या रोहिणी निलेश पाराध्येने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ब्रह्मपुरी गावातील स्वतःच्या ‘हॉटेल ग्रामपंचायत’ या हॉटेलच्या स्वयंपाकघरात त्यांनी गळफास घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अनेक चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

रोहिणी पाराध्ये आणि तिचे पती निलेश पाराध्ये हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर रील्स बनवत लोकप्रिय झाले होते. त्यांच्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत होता. याच लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी ब्रह्मपुरी येथे ‘हॉटेल ग्रामपंचायत’ हा व्यवसाय उभारला होता. विशेष म्हणजे रोहिणी स्वतः हॉटेलचे किचन सांभाळत होती आणि हॉटेलमधील दैनंदिन कामांशी संबंधित रील्स सोशल मीडियावर पोस्ट करत असत.

हेही वाचा: Crime News : क्रूरतेचा कळस! वृद्ध दाम्पत्याचा धारदार शस्त्राने गळा चिरला, मृतदेहावर टाकली राख अन् पालापाचोळा; आजी-आजोबांचा मृतदेह पाहून नातवाचा थरकाप

मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणीने  हॉटेलच्या किचनमध्ये ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही घटना समजताच तिच्या पतीने तातडीने तिला मंगळवेढा येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.

या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्महत्येमागे कौटुंबिक, मानसिक की अन्य कोणते कारण होते, याचा तपास मंगळवेढा पोलीस करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील चौकशी सुरू आहे.

हेही वाचा: Akola Minor Girls : अकोल्यातून धक्कादायक प्रकार समोर; तब्बल 55 अल्पवयीन मुली गरोदर

रोहिणी पाराध्ये सोशल मीडियावर तिच्या साध्या आणि ग्रामीण शैलीतील व्हिडिओंमुळे ओळखली जात होती. तिच्या रील्सना हजारो लोकांचा प्रतिसाद मिळत असे. ‘हॉटेल ग्रामपंचायत’ हे देखील तिच्या व्हिडिओंमुळे परिसरात प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे तिच्या अचानक झालेल्या निधनाने ब्रह्मपुरी गावासह सोशल मीडियावरील चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर अनेकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला असून रोहिणीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मंगळवेढा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number