Crime News: प्रसिद्ध फिटनेस यूट्यूबर मसूद चंडीला घरात घुसून संपवलं; मेहुण्यानेच मित्रांच्या मदतीने खुपसला खंजीर

फिटनेस कंटेंट क्रिएटर आणि प्रसिद्ध यूट्यूबर मसूद चंडी ऊर्फ शेख महबूब (SK Mahboob) याला त्याच्या राहत्या घरात घुसून अत्यंत क्रूरपणे संपवण्यात आलं.

Crime News: प्रसिद्ध फिटनेस यूट्यूबर मसूद चंडीला घरात घुसून संपवलं; मेहुण्यानेच मित्रांच्या मदतीने खुपसला खंजीर

Crime News:  हैदराबादमधील गोलकोंडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फिटनेस कंटेंट क्रिएटर आणि प्रसिद्ध यूट्यूबर मसूद चंडी ऊर्फ शेख महबूब (SK Mahboob) याला त्याच्या राहत्या घरात घुसून अत्यंत क्रूरपणे संपवण्यात आलं. शुक्रवार, 12 जून 2026 रोजी दुपारी 3:20 ते 3:30 च्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोरांनी घरात प्रवेश करून लोखंडी सळ्या, जिमचे साहित्य आणि खंजीरने मसूदवर एकामागून एक सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेला मसूद रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.

कौटुंबिक वादातून मेहुण्यानेच रचला कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार मसूदचा मेहुणा (पत्नीचा भाऊ) शेख सोहेल हाच आहे. मसूदने साधारण 18 महिन्यांपूर्वी गोलकोंडा येथील बडा बाजार भागातील एका तरुणीशी प्रेमविवाह केला होता आणि त्यांना 6 महिन्यांचे एक मूलही आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते. नुकत्याच झालेल्या एका भांडणामुळे मसूदने आपल्या पत्नीला आणि मुलाला तिच्या माहेरी पाठवून दिले होते. याच रागातून आणि पूर्ववैमनस्यातून सोहेलने त्याचे दोन मित्र, अफ्फू आणि जाबीर यांच्यासोबत मिळून मसूदला संपवण्याचा कट रचला. 

आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची 3 विशेष पथके तैनात
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. अतिरिक्त डीसीपी कृष्णा गौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय शेख महबूब हा यूट्यूबवर बॉडीबिल्डिंगचे व्हिडिओ अपलोड करायचा आणि सोबतच इलेक्ट्रिशियन म्हणूनही काम करत असे. 

हेही वाचा –Nanded Aanchal Mamidwar : 'मी तोंड उघडलं तर बदनामी होईल'; घर सोडण्याच्या आरोपावर अखेर आंचलने मौन सोडलं, सक्षमच्या घरच्यांबाबत केला धक्कादायक खुलासा

दरम्यान, मसूदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी मृतकाच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103(1) (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तिन्ही आरोपी फरार असून त्यांना बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांची 3 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number