तोतया टीसी पासून सावधान !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   विरार मध्ये टीसी म्हणून वावरणाऱ्या तोतया व्यक्तीला पकडण्यात आले आहे. रेल्वे पोलिसांनी या तोतया टीसी विरुद्ध 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चौकशीदरम्यान फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव शिवाजी देवते असे असून तो बुलडाण्यातील रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले आहे.   फिरोजपूर एक्स्प्रेस मध्ये शिवाजी देते हा इसम टीसी असल्याचे सांगून प्रवाशांकडे […]

तोतया टीसी पासून सावधान !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विरार मध्ये टीसी म्हणून वावरणाऱ्या तोतया व्यक्तीला पकडण्यात आले आहे. रेल्वे पोलिसांनी या तोतया टीसी विरुद्ध 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चौकशीदरम्यान फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव शिवाजी देवते असे असून तो बुलडाण्यातील रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

फिरोजपूर एक्स्प्रेस मध्ये शिवाजी देते हा इसम टीसी असल्याचे सांगून प्रवाशांकडे तिकीटाची मागणी करत होता. प्रवाशांना तो संशयास्पद वाटल्यामुळे तिथे असणाऱ्या दुसऱ्या  टिसीला प्रवाशांनी तोतया टिसीची माहिती दिली. तेव्हा खऱ्या टिसीने त्याच्याकडे बॅच, बिल्ला मागितला पण, तो त्याच्याकडे नसल्याने त्याला विरार स्थानकात उतरवून पोलिसांच्या ताब्यात दिले. 

 

वेळीच प्रवासी सतर्क झाल्यामुळे तोतया टीसीला पकडण्यात पोलिसांना यश आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number