नागपुरात आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपुरात बनावट अॅलोपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधांच्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ‘चायमोरल फोर्ट’ या नामांकित औषधाची बनावट आवृत्ती आणि ‘कामराज कॅप्सूल’ या आयुर्वेदिक उत्पादनात लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी वापरले जाणारे धोकादायक अॅलोपॅथिक औषध बेकायदेशीरपणे मिसळले असल्याचे समोर आले आहे.
यावेळी सदरील औषध अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि बनावट असल्याचे तपासात उघड झाले आहे. तर टोरेंट फार्मास्युटिकल्स कंपनीच्या नावाने बनावट ‘चायमोरल फोर्टे’ (ट्रायस्पीन चायमोट्रायस्पीन टॅबलेट) या औषधाची विक्री नागपूरसह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील विविध औषध विक्रेत्यांमार्फत होत असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी 13 जणांविरुद्ध फसवणूक, संगणमत, जनतेच्या जीवितास धोका निर्माण करणे आदी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
एका मोठ्या रॅकेटचा अन्न औषध प्रशासनाने केला भांडाफोड केला असून या याप्रकरणी नागपूरच्या गणेशपेठ पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नागपुरात विक्री होत असलेल्या 'कामराज कॅप्सुल' या औषधाच्या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या असून दोन्ही प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.