बनावट नोटा विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

बनावट नोटा विक्री करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा सांगली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कल्याण आणि नवी मुंबई येथील पाच जणांना अटक करत २ लाख ६६ हजारांच्या १२३ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व दोन हजारांच्या नोटा होत्या. आत्तापर्यंत महाराष्ट्रात कोटयवधी रुपयांच्या बनावट नोटा खपवण्यात आल्याची अंदाज असून पश्चिम बंगाल मधून छपाई करून या नोटा भारतात […]

बनावट नोटा विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

बनावट नोटा विक्री करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा सांगली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कल्याण आणि नवी मुंबई येथील पाच जणांना अटक करत २ लाख ६६ हजारांच्या १२३ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व दोन हजारांच्या नोटा होत्या. आत्तापर्यंत महाराष्ट्रात कोटयवधी रुपयांच्या बनावट नोटा खपवण्यात आल्याची अंदाज असून पश्चिम बंगाल मधून छपाई करून या नोटा भारतात आणल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे.

चार दिवसांपूर्वी सांगलीत बनावट नोटा विक्री करताना शहर पोलिसांनी एकास अटक करत दोन हजार रुपयांच दोन नोटा जप्त केल्या होत्या. यामधील आरोपी हा कल्याण येथील होता. यानंतर शहर पोलिसांनी अधिक तपास करत दोन दिवसांपूर्वी कल्याणमधून आणखी दोघांना अटक करत दोन हजारांच्या आणखी 29 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या, तर तपासात आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली. यानंतर शहर पोलिसांनी कल्याण आणि नवी मुंबई येथे पुन्हा छापे टाकून सुरेश उर्फ मनीष मल्ला ठाकूरी आणि जीलानी अश्फाक शेख यास अटक केली. यावेळी त्यांच्या कडे 2 हजारांच्या 92 बनावट नोटा सापडल्या.
या जप्तीमध्ये आत्तापर्यंत एकूण 2 हजार 66 हजारांच्या 123 बनावट नोटा, 7 मोबाईल, 5 एटीएम कार्ड आणि 3 बोगस आधारकार्ड जप्त करण्यात आली आहेत. आता पर्यंतच्या तपासात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात या टोळीकडून सुमारे 30 लाखांच्या बनावट नोटा विक्री करण्यात आली आहे.

मुख्य सूत्रधार जिलानी याच्या तपासातून आणखी माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे. कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा खपवण्यात येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे, तर या सर्व बनावट नोटा पश्चिम बंगाल मधून छपाई करून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणण्यात येत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number