अर्थसंकल्पातील चर्चेला फडणवीसांनी दिले उत्तर

राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस मांडत आहेत. राज्याचे अर्थसंकल्प सादर होऊन आठवडा झाला असला तरी विरोधक सातत्याने अर्थसंकल्पाचा विरोध करताना पाहायला मिळत आहेत. बुधवारीही विरोधकांनी डोंगर आणि उंदराचं चित्र हाती घेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आणि खोदा पहाड निकला चुहा अशा घोषणा दिल्या. यावर, सभागृहात अर्थमंत्री फडणवीसांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. अर्थसंकल्पाचं पंचामृत सर्वांना […]

अर्थसंकल्पातील चर्चेला फडणवीसांनी दिले उत्तर

राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस मांडत आहेत. राज्याचे अर्थसंकल्प सादर होऊन आठवडा झाला असला तरी विरोधक सातत्याने अर्थसंकल्पाचा विरोध करताना पाहायला मिळत आहेत. बुधवारीही विरोधकांनी डोंगर आणि उंदराचं चित्र हाती घेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आणि खोदा पहाड निकला चुहा अशा घोषणा दिल्या. यावर, सभागृहात अर्थमंत्री फडणवीसांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

अर्थसंकल्पाचं पंचामृत सर्वांना मिळालं असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचेही फडणवीस म्हणाले. विरोधकांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या नमो योजनेवर प्रश्न उपस्थित केले या प्रश्नांना उत्तरे देताना फडणवीसांनी योजनेत मिळणाऱ्या रक्कमेचा हिशोब मांडला.

यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून राज्याच्या प्रगतीला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांचा सन्मान होणार असल्याचेही फडणवीस म्हणाले. राज्याचा अर्थसंकल्प करत असताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही मदत घेतली असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी सभागृहात फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला. तुमच्या सरकारच्या काळात शिवसेनेला सर्वात कमी निधी देण्यात आला. त्यावेळी शिवसेना सर्वात मोठा पक्ष होता, त्यांना तुम्ही फक्त 15 टक्के निधी दिला, आता आमच्यासोबत सेनेचे 40 आमदार आहेत तरीही आम्ही 34 टक्के निधी दिला. त्यामुळे ‘तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून आम्ही मारली मुसंडी’ अशा शब्दांत रामदास आठवलेंच्या स्टाईलमध्ये फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number