पहलगामच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पार पडणारा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा रद्द

25 एप्रिल रोजी मुंबईतील वरळी येथील डोम, एनएससीआय येथे शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित केलेले कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.

पहलगामच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पार पडणारा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा रद्द

मुंबई: मंगळवारी, काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन 25 एप्रिल रोजी मुंबईतील वरळी येथील डोम, एनएससीआय येथे शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार', 'स्वर्गीय राज कपूर', 'स्वर्गीय व्ही. शांताराम जीवन गौरव' आणि 'विशेष योगदान पुरस्कार' सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने सांगितले आहे की, 'लवकरच या पुरस्कार सोहळ्याची नवीन तारीख कळविण्यात येईल'.

गायक अरिजित सिंगने दिली कॉन्सर्ट रद्द झाल्याची माहिती:

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या कलाकारांनी आणि नामवंत व्यक्तींनी आपल्या कार्यक्रमांना रद्द केले आहे. अशातच, सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करून गायक अरिजित सिंगने आपला कॉन्सर्ट रद्द झाल्याची माहिती दिली. नुकताच, गायक अरिजित सिंगने त्याच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीज सेक्शनवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले की, 'पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, आयोजकांनी आणि कलाकारांनी एकत्रितपणे 27 एप्रिल रोजी चेन्नईमध्ये होणारा आगामी कॉन्सर्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे'.

त्यासोबतच, गायक अरिजित सिंग म्हणाले की, 'ज्या लोकांनी या कॉन्सर्टची तिकिटे खरेदी केली आहेत, त्यांना लवकरच तिकिटाचे पैसे परत मिळतील. तसेच, कॉन्सर्टशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्यांनी वेबसाइटला भेट द्यावी,' अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल शहीद

चाहत्यांचे पैसे परत केले:

अरिजित सिंग म्हणाले की, ज्या लोकांनी कॉन्सर्टची तिकिटे खरेदी केली आहेत, त्यांना लवकरच पैसे परत मिळतील. त्यांनी लिहिले, 'सर्व तिकीट खरेदीदारांना पैसे परत केले जातील.' यासोबतच, शोशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या आणि माहितीसाठी त्यांनी वेबसाइटला भेट देण्यास सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number