राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करत ईडीची चाहूल लागली असल्याची माहिती दिली. तसेच नवाब मलिकांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माजी मुख्यमंत्री केंद्रीय यंत्रणांना माझ्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात खूप रस दाखवत असल्याची टीका मलिकांनी केली आहे.
‘माझ्या विरोधात कारवाई करण्यासाठी केंद्रीय तपसयंत्रणांना सूचना देण्यास माजी मुख्यमंत्री फार रस दाखवत आहेत. त्यामुळे मी सुचवितो की, त्यांनी स्वत:ची ओएसडी म्हणून नियुक्ती करावी. तसेही माजी मुख्यमंत्री म्हणून नियुक्त्यांचा त्यांना भरपूर अनुभव आहे.’ असे म्हणत, त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी रात्री ट्विट केले की, ‘उद्या पहाटे माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार असल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली. तसेच त्यांच्या स्वागतासाठी मी तयारी करणार असून पाहुण्यांसाठी चहा आणि बिस्किटही तयार असणार आहेत. तसेच माझ्या घरचा पत्ता शोधण्यासाठी मला फोन करावा,’ असे नवाब मलिकांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.