मुंबई, १६ जून २०२३, प्रतिनिधी : कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपा सरकारने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द केला. तसेच सावरकरांचा धडाही अभ्यासक्रमातून वगळला. यावरून आता काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आरएसएसचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे धडे वगळल्याने भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी यावरून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचं सरकार आल्यानंतर यापेक्षा दुसरं काही अपेक्षित नाही असं म्हटलंय.
महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी यावरून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचं सरकार आल्यानंतर यापेक्षा दुसरं काही अपेक्षित नाही असं म्हटलंय. फडणवीस म्हणाले, “माझा महाविकास आघाडीला सवाल आहे की, ते महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार म्हणत आहेत तो हाच आहे का? आता उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय आहे? त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. ते ज्यांच्या मांडिला मांडी लावून बसले ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव पुसायला निघाले आहेत. ते धर्मांतरणाला पाठिंबा देत आहेत.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
पुढे फडणवीस म्हणाले की, ”एखादा धडा तुम्ही अभ्यासक्रमातून वगळू शकता, मात्र ते लोकांच्या मनातून सावरकर-हेडगेवार यांना काढू शकत नाहीत. ते लोकांच्या मनातून एकही स्वातंत्र्यसंग्रामी काढू शकत नाही. काँग्रेसचं सरकार आल्यानंतर यापेक्षा वेगळं काहीच अपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करण्यासाठी कर्नाटकचं सरकार निर्णय घेत आहे.माझा मविआला सवाल आहे की, ते महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार म्हणत आहेत तो हाच आहे का? माझा एक प्रश्न उद्धव ठाकरेजींना आहे. आता तुमची प्रतिक्रिया काय आहे? ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात ते जर आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव पुसायला निघालेले आहेत, धर्मांतरणाला पूर्णपणे समर्थन द्यायला निघाले आहेत तर आता तुमचं मत काय आहे हे देखील तुम्ही सांगितलं पाहिजे. सत्तेसाठी तुम्ही समजोता केला हे यातून अतिशय स्पष्ट होत आहे. हे असे निर्णय घेतल्याने ते कोणाचंही नाव जनतेच्या मानसपटलावरुन पुसू शकणार नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.