फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

शिर्डी  १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राला आज एक ट्रिपल इंजन असलेले मजबूत सरकार मिळाले आहे. काही लोक दिवसा स्वप्न पाहत आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आहे, अशा वावड्या उठवतात. होय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे आहे. मात्र याचे कारण आमच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचे रक्षण करण्यासाठी आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वाकडी नजर केली तर त्याला त्याची […]

फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

शिर्डी  १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राला आज एक ट्रिपल इंजन असलेले मजबूत सरकार मिळाले आहे. काही लोक दिवसा स्वप्न पाहत आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आहे, अशा वावड्या उठवतात. होय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे आहे. मात्र याचे कारण आमच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचे रक्षण करण्यासाठी आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वाकडी नजर केली तर त्याला त्याची जागा दाखवण्याचे काम हे दोन्ही उपमुख्यमंत्री करतील, असे सडेतोड प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले. आज शिर्डी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ तास काम करतात. संवेदनशील काम करतात. इर्शाळवाडीत दुर्घटना घडली, जिथे प्रशासन पोहचत नव्हते तिथे पायपीट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोचलेत. त्यामुळे आम्ही तिघे एकत्रित आलो. शिंदेंच्या कामाची शैली आणि अजित पवार आणि माझ्या कामाची शैली तुम्हाला माहिती आहे. आम्ही तिघे एकत्रित आलोय त्या जोडीचा जवाब नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

मी पुन्हा येईन या वाक्याची दहशत अजूनही विरोधकांमध्ये बघायला मिळते. काल राष्ट्रीय नेते म्हणाले फडणवीसांनी मी पुन्हा येईन म्हणाले. आता मोदीजी तेच म्हणतात. मी ज्यावेळी म्हणालो मी पुन्हा येईन. लोकांनी पुन्हा मला आणले होते. परंतु काही लोकांनी आमच्याशी बेईमानी केली. म्हणून मी येऊ शकलो नाही. पण लक्षात ठेवा, ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा पूर्ण पक्ष घेऊनच आम्ही आलो. त्यामुळे शंका ठेवण्याचे कारण नाही असा निशाणा देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर साधला.

या देशाला मोदींनी उच्च शिखरावर नेले. गरीब कल्याण अजेंडा मोदींनी दिला. केवळ भारतीयांचा आणि शेवटच्या माणसाच्या उद्धाराचा विचार करतात. देश त्यांच्यासोबत उभा राहील. पुढच्या १५ ऑगस्टला त्यांचेच भाषण लाल किल्ल्यावरून होईल यात शंका नाही, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनाही प्रत्युत्तर दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number