फेसबुक वापरत असाल तर सावधान!

वृत्तसंस्था, मुंबई फेसबुकवर अनोळख्या व्यक्तींना भेटणे त्यांच्याशी संवाद साधणे आपणा सर्वांनाच आवडते पण एखाद्या वेळी यात तुमची फसवणूकही होऊ शकते. तर काही वेळेस ही फेसबुकची फ्रेंडशीप तुमच्या जीवावरही बेतू शकते. मुंबईच्या चेंबूरजवळील गव्हाणपाडा परिसरातील एका तरुणाला फेसबुकवरील मैत्री चांगलीच महागात पडलीय. 8 जानेवारीला हितेंद्र उर्फ बाबू ठाकूरला फेसबुकवर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्याने ती […]

फेसबुक वापरत असाल तर सावधान!

वृत्तसंस्था, मुंबई

फेसबुकवर अनोळख्या व्यक्तींना भेटणे त्यांच्याशी संवाद साधणे आपणा सर्वांनाच आवडते पण एखाद्या वेळी यात तुमची फसवणूकही होऊ शकते. तर काही वेळेस ही फेसबुकची फ्रेंडशीप तुमच्या जीवावरही बेतू शकते. मुंबईच्या चेंबूरजवळील गव्हाणपाडा परिसरातील एका तरुणाला फेसबुकवरील मैत्री चांगलीच महागात पडलीय. 8 जानेवारीला हितेंद्र उर्फ बाबू ठाकूरला फेसबुकवर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्याने ती स्वीकारली. मग दोघांमध्ये बोलणे सुरु झाले.

16 जानेवारीला त्या मुलीने ठाकूरला गोवंडी येथे भेटायला सांगितले. ठाकूरही तेथे वेळेत हजर झाला. लांबून एका मुलीने हात दाखवून त्याला बोलावले. तीच मुलगी असावी म्हणून तो जवळ गेला. तेव्हा पाच ते सहा जणांच्या टोळीने त्याला लोखंडी रॉड आणि स्टंपने चोप दिला आणि त्याच्याकडील 5 लाख 92 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले.

घटनेची वर्दी लागताच देवनार पोलिसांनी ठाकूरच्या तक्रारीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल केला. तपासणी दरम्यान पोलिसांनी 3 जणांना अटकही केले. पण, याबाबत अधिक तपासणीत विचित्रच प्रकार समोर आला. काही दिवसांपूर्वी एका तरुणासोबत पार्किंगवरून दोन गटांत  वाद झाला. या वेळी ठाकूरने आरोपीच्या काकावर हात उगारला होता. याचाच बदला घेण्यासाठी आरोपीने मुलीच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले. यामार्फत ठाकूरची फसवणूक करत त्याला मारहाण करून लुटले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number