जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नाताळ म्हटल्यावर सुट्टीही आलीच. आणि सुट्टीत कुटुंबियांसोबत फिरायला जाणे सर्वच पसंत करतात. त्यात नाताळ म्हटले की गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची वाढ मोठ्या संख्येने होत असते. म्हणूनच रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने 21 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत विषेश गाड्या सोडण्याचे ठरवले आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते करमाळी या स्थानकांदरम्यान या गाड्या धावणार आहेत. या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांवर देखील थांबणार आहेत.
अशा प्रकारे असणार गाड्यांचे वेळापत्रक
सीएसएमटी ते करमाळी (02025) ही गाडी 21 आणि 28 डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजता सुटणार असून ती दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी करमाळीला पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी करमाळी ते सीएसएमटी 21 आणि 28 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुटणार असून रात्री 11 वाजता सीएसएमटीला येईल.
सीएसएमटी ते करमाळी (02027) ही गाडी 23, 24, 30 आणि 31 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी सुटणार असून त्याच दिवशी सकाळी 11 वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी 23,24, 30 आणि 31 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता सुटणार असून त्याच दिवशी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सीएसएमटी येथे पोहचतील.
सीएसएमटी ते करमाळी (20229) खास गाडी 25 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी सुटणार असून त्याच दिवशी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी करमाळीला पोहोचेल.