पुण्यात लक्ष्मी रस्त्यावर ‘पादचारी दिना’चा उत्साह

पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करण्यात येतात. पुण्यातील लक्ष्मी रस्ता नेहमीच गजबजलेला असतो. नेहमी या रस्त्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात पाहण्यात येते. मात्र दरम्यान आज लक्ष्मी रस्त्यावर पुणेकरांनी फॉरेनचा अनुभव घेतला आहे. पुण्यात आज पादचारी दिन साजरा करण्यात येत आहे. पुण्यातील गजबजलेला लक्ष्मी रस्ता सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला […]

पुण्यात लक्ष्मी रस्त्यावर ‘पादचारी दिना’चा उत्साह

पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करण्यात येतात. पुण्यातील लक्ष्मी रस्ता नेहमीच गजबजलेला असतो. नेहमी या रस्त्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात पाहण्यात येते. मात्र दरम्यान आज लक्ष्मी रस्त्यावर पुणेकरांनी फॉरेनचा अनुभव घेतला आहे.

पुण्यात आज पादचारी दिन साजरा करण्यात येत आहे. पुण्यातील गजबजलेला लक्ष्मी रस्ता सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला असून पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावर सजावट करण्यात आली. तसेच झाडाच्या कुंड्या, स्वच्छ रस्ते, रस्त्यावर काढलेली आकर्षक रांगोळी यामुळे रस्ता सुंदर दिसत आहे. परिणामी हा रस्ता पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. नेहमी गर्दीचा रस्ता, वाहतूक कोंडीचा हा रस्ता शांत आणि निवांत दिसत आहे.

एक दिवस का होईना पण पुणेकरांनी फॉरेनचा अनुभव घेतला. तसेच रस्त्याच्या मधोमध लहान मुलांसाठी लुडो खेळ खेळण्याची सोय करण्यात आली. या नव्या रस्त्याचा पुणेकर आनंद घेत आहेत मात्र हा उपक्रम एक दिवासाचा नसून येणाऱ्या दिवसांतही असेच उपक्रम राविण्यात येण्याची इच्छा पुणेकरांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number