‘आताही मुख्यमंत्री व्हायला आवडेल’

आतासुद्धा बहुमत मिळाल्यास राज्याचा मुख्यमंत्री होण्यास आवडेल, असा पुनरुच्चार राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी अजित पवार १४५चा बहुमताचा आकडा कोठून आणणार?, असा खोचक सवाल केला होता. यावर, अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अजित पवारांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा बोलून […]

‘आताही मुख्यमंत्री व्हायला आवडेल’

आतासुद्धा बहुमत मिळाल्यास राज्याचा मुख्यमंत्री होण्यास आवडेल, असा पुनरुच्चार राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी अजित पवार १४५चा बहुमताचा आकडा कोठून आणणार?, असा खोचक सवाल केला होता. यावर, अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अजित पवारांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

याआधीही ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या मुलाखतीत अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच, या मुलाखतीत अजित पवारांन मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा खुलासा करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निर्णय चुकीचा ठरवला. २००४मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी आली होती. त्यावेळी संधी घेतली असती तर आर. आर. पाटील मुख्यमंत्री झाले असते, असं अजित पवार म्हणाले.

तसेच, ‘२००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळेल एवढी संख्या जनतेने दिली होती, पण राजकीय जीवनात काम करत असताना काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. २००४मध्ये राष्ट्रवादीची काँग्रेससोबत आघाडी होती, तेव्हा राष्ट्रवादीच्या ७१ जागा तर काँग्रेसच्या ६९ जागा आल्या होत्या. तर, मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीलाच मिळेल अशी मानसिकता काँग्रेसने केली होती, असे अजित पवार म्हणाले. मात्र, पक्षाची शिस्त पाळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर घेतलेले निर्णय ऐकावे लागताता, असे पवार म्हणाले.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number