महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप हे सातत्याने सुरूच असतात. त्यातच भाजपाने उद्धवना चांगलाच शाब्दिक चिमटा काढला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने दोन जागा जरी दिल्या तरी ते महाविकास आघाडी सोडणार नाहीत. पक्ष संपला तरी चालेल पण महाविकास आघाडीमध्ये राहणे ते पसंत करतील. ४० आमदार गेले, १२ खासदार गेले तरीही त्यांना काही वाटत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना लोकसभेच्या ४८ पैकी २ जागा दिल्या तरी ते राहतील, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. मात्र, आमच्यात शिवसेना भाजप युतीत सगळं काही सुरळीत सुरु आहे. जागा वाटपावरून आमच्यात टाचणीभरही नाराजी नाही असे ते म्हणालेत.