अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यावर चालू आर्थिक वर्षाचा सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. 2020-21 मध्ये देशाचा आर्थिक विकास दर 6 ते 6.5 टक्के होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये देशाचा GDP दर 4.5 % आहे.
मार्च 2013 नंतर पहिल्यांदाच GDP इतका खाली गेला आहे.
GST मुळे बाजार पुन्हा एकदा पूर्वपदावर येत असल्याचं सांगण्यात येतंय.
जानेवारी 2020 मध्ये GST मधून रेकॉर्डब्रेक वसूली होईल असा अंदाज आहे.
नोव्हेंबर 2019 पासून GST वसुलीचा आलेख चढा राहिला आहे.