संकटग्रस्त भारतीयांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय रहिवाश्यांना मदत करण्यासाठी भारत सरकारने नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना नियंत्रण कक्ष सक्रिय केले आहेत. युक्रेनला लागून असलेल्या पोलंड, रोमानिया, हंगेरी आणि स्लोपव्हाक रिपब्लिकमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय सरकारने जारी केलेल्या नंबरवर फोन करून मदत मिळवू शकतात. रशिया-युक्रेन युद्धाचा […]

संकटग्रस्त भारतीयांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय रहिवाश्यांना मदत करण्यासाठी भारत सरकारने नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे.

भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना नियंत्रण कक्ष सक्रिय केले आहेत. युक्रेनला लागून असलेल्या पोलंड, रोमानिया, हंगेरी आणि स्लोपव्हाक रिपब्लिकमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय सरकारने जारी केलेल्या नंबरवर फोन करून मदत मिळवू शकतात.

रशिया-युक्रेन युद्धाचा तीढा कायम

रशिया-युक्रेनमधील युद्धाचा तीढा कायम असून रशियाकडून युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला, गोळीबार करण्यात येत आहे. रशियाच्या लष्करी सैन्याचा युक्रेनची राजधानी कीव शहरावर सतत हल्ला सुरू आहे. रशियाने युक्रेनमधील कीव शहरातील टीव्ही वाहिनीच्या मनोऱ्यावर हल्ला केला आहे. या टीव्ही मनोऱ्यावरील हल्ल्यात आठ जण ठार झाले आहेत. या इमारतीवर हल्ला झाल्यामुळे कामकाज प्रभावित झाले आहे. तसेच या इमारतींच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना घराबाहेर पडण्याच्या सूचना रशियाने दिल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number