मुंबई,२ जून २०२३, प्रतिनिधी : हिंदी सिनेसृष्टीत सध्या लग्नसराई सुरु आहे. अलीकडच्या काळात बऱ्याच कलाकारांनी लग्नगाठ बांधली त्यांनतर आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सुद्धा लग्नसराईचे वारे वाहू लागलेत.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता वरुण तेज येत्या ९ जून रोजी अभिनेत्री लावण्या त्रिपाठीसोबत साखरपुडा करणार आहे. साखरपुड्यानंतर काही दिवसांनी त्या दोघांचा लग्न सोहळा पार पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता त्यांच्या या शाही साखरपुड्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.


वरुण आणि लावण्याच्या साखरपुड्याला बरेच कलाकार उपस्थित राहणार आहेत. यात राम चरण, उपासना कोनिडेला , साई धरम तेज, अल्लू सिरिश, सुश्मिता कोनिडेला, श्रीजा कोनिडेला, मेगास्टार चिरंजीवी आदी कलाकारांचा समावेश असणार आहे.