Bandra Demolition: वांद्र्यातील अतिक्रमणावर तोडक कारवाई! बाटल्या आणि दगड फेक करत कारवाईला विरोध; पोलिसांकडून लाठीचार्ज

कालपासून वांद्रे रेल्वे परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी अतिक्रमण करण्यात आले आहे. आज अतिक्रमणाचा दुसरा दिवस आहे. जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात येत आहे.

Bandra Demolition: वांद्र्यातील अतिक्रमणावर तोडक कारवाई! बाटल्या आणि दगड फेक करत कारवाईला विरोध; पोलिसांकडून लाठीचार्ज

कालपासून वांद्रे रेल्वे परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी अतिक्रमण करण्यात आले आहे. आज अतिक्रमणाचा दुसरा दिवस आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 100 सोडून सर्व अतिक्रमण काढण्यात येत आहे, काल 70 ते 80 टक्के झालं होतं. आज सकाळपासून पुन्हा कारवाई सुरू झाली आहे. यावेळी जवळपास बाराशे मनुष्यबळ सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होत. मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील रेल्वे रुळांलगत असलेल्या 400 ते 500 अनधिकृत झोपड्याच अतिक्रमण रेल्वे प्रशासन काढत आहे. 8 ते 10  बुलडोझर आणि 3 पोकलेनच्या साहाय्याने मोठी कारवाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाही करण्यात येत आहे. 

हेही वाचा- Medical Stores Closed: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप! मुंबई, पुण्यासह राज्यातील लाखो मेडिकल बंद, अत्यावश्यक औषधांसाठी काय आहेत पर्याय?

दरम्यान वांद्रे पूर्व स्टेशन परिसरातील अतिक्रमण काढत असताना यात एक मशीद देखील पडण्यात आली. त्यावेळी जमाव क्षुब्ध झाला आणि पोलिसांवर पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक साहित्य आणि दगड फेक करू लागला. यावेळी परिस्थिती पाहता पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. पोलिसांनी जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ऐकत नसल्यामुळे लाटी चार्ज करावा लागला. यात काही युवकही अग्रेसिव्ह झाले त्यांच्यावरही पोलिसांनी लाठीचर्ज केला. यावेळी पोलिसावर पाणी आणि बॉटल फेकण्यात महिलांचे प्रमाण जास्त होते. पोलिसांनी वांद्रे स्टेशन परिसरातून सर्वांना बाहेर काढलं. दरम्यान वांद्रे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे पण पोलिसांच्या नियंत्रणात आहे.

हेही वाचा- NCP Sharad Pawars Meeting : एकदाचं ठरलं! दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पवारांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीत नेमकं काय घडलं?

मुंबईतल्या वांद्रे रेल्वे परिसरात असलेल्या झोपडपट्ट्यांचा निष्काळसन म्हणजेच अतिक्रमण काढण्याचं काम कालपासून सुरू करण्यात आला आहे. 2017 मध्ये या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल मागण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर तिथेही रेल्वेच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर आज पश्चिम रेल्वेच्या वतीने ही अतिक्रमण काढण्यास सुरू केली. या अतिक्रमणावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात पोलीस चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरू करण्यात आली असून पुढील तीन दिवस कारवाई करण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number