कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम; सदाभाऊ खोत, पडळकरांची माघार

एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांनी बस्तान ठोकले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप तातपुरता मागे घेत असल्याची घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ […]

कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम; सदाभाऊ खोत, पडळकरांची माघार

एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांनी बस्तान ठोकले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप तातपुरता मागे घेत असल्याची घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून माघार घेण्याची घोषणा केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका ठाम ठेवली आहे.

एसटीचे संपकरी कर्मचारी विलिनीकरणावर ठाम असून हा संप सुरुच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातली लढाई आम्ही जिंकली, अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली आहे तर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी, मिळेल ते पदरात पाडून घ्यायचे आणि जे नाही मिळाले त्यासाठी भांडत राहायचे हे धोरण अवलंबल्याचे स्पष्ट केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवायचा की नाही हे त्यांनीच ठरवायचे असल्याचे ते म्हणाले. असे म्हणत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी या आंदोलातून माघार घेण्याची घोषणा केली असून कर्मचाऱ्यांनी आम्हाला साद घातली तर आम्ही युपढेही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊ असे गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. ते म्हणाले, संपकारी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी आता न्यायालयात पोहचली आहे. त्यासाठी न्यायालयाने त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे समितीच्या अहवालानंतर एसटी महामंडळाच्या विलिनीकरण्याच्या मागणीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. मात्र एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन होईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४० टक्क्यांनी वाढ करण्याचा राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number