Elon Musk: गुगल की ओपन-एआय? ‘हा’ ब्रँड ठरणार जगाचा किंग; पाहा काय आहे एलॉन मस्क यांचं भाकीत

AI तंत्रज्ञानाचा वापर अवकाश संशोधन आणि उपग्रह व्यवस्थापनात वाढणार असल्यामुळे या क्षेत्रातही स्पर्धा वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

Elon Musk: गुगल की ओपन-एआय? ‘हा’ ब्रँड ठरणार जगाचा किंग; पाहा काय आहे एलॉन मस्क यांचं भाकीत

वॉशिंग्टन: कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence, AI) तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत प्रचंड वेगाने स्पर्धा वाढली आहे. जगातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये अधिक शक्तिशाली AI मॉडेल विकसित करण्याची चढाओढ सुरू आहे. आता केवळ कंपन्यांपुरतीच ही स्पर्धा मर्यादित राहिलेली नसून, विविध देशांची तांत्रिक ताकदही AI च्या आधारे मोजली जाऊ लागली आहे. विशेषतः अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमध्ये AI क्षेत्रात आघाडी मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

अमेरिकन अब्जाधीश उद्योजक एलॉन मस्क यांनी या संदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्तेची ही स्पर्धा फक्त पृथ्वीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती अवकाशातही सुरू झाली आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर भविष्यात अवकाश संशोधन आणि उपग्रह व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे या क्षेत्रातही कंपन्या आणि देश आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मस्क यांच्या मते, पृथ्वीवरील AI स्पर्धेत भविष्यात चीन आघाडीवर येऊ शकतो. त्यांनी सांगितले की चीनमधील AI मॉडेल्स सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत आणि त्यांचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भविष्यात जागतिक स्तरावर चीनच्या AI तंत्रज्ञानाचा स्वीकार अधिक वेगाने होऊ शकतो, असे त्यांनी सूचित केले.

हेही वाचा: Dhurandhar 2 : कोण आहे 'बडे साहब'? 'धुरंधर 2' मध्ये अंडरवर्ल्ड डॉनच्या भूमिकेवरून पडदा उठला; या कलाकारानं साकारला दाऊद

चीनच्या प्रगतीमागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तेथे विकसित होत असलेली तुलनेने स्वस्त आणि ओपन सोर्स AI मॉडेल्स असल्याचे मस्क यांनी सांगितले. यामुळे अधिक कंपन्या आणि संशोधकांना या तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. याउलट अमेरिकेमधील गूगल, ओपनएआय आणि मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपन्या अधिक नियंत्रित आणि व्यावसायिक स्वरूपातील AI मॉडेल्सवर भर देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पश्चिम गोलार्धातील देशांमध्ये मात्र AI क्षेत्रात गूगल आघाडीवर राहू शकते, असेही मस्क यांनी सांगितले. अमेरिका, कॅनडा आणि ब्राझीलसारख्या देशांमध्ये गूगलचे संशोधन आणि तांत्रिक क्षमता मजबूत असल्याने तेथे कंपनीचे वर्चस्व कायम राहू शकते, असे त्यांचे मत आहे.

अवकाशातील AI स्पर्धेबाबत बोलताना मस्क यांनी त्यांची कंपनी स्पेसएक्सचा उल्लेख केला. त्यांच्या मते, अवकाश क्षेत्रात AI तंत्रज्ञानाच्या वापरात स्पेसएक्सला सध्या कोणतीही मोठी स्पर्धा नाही. त्यामुळे भविष्यात अवकाशातील AI तंत्रज्ञानाच्या शर्यतीत स्पेसएक्स आघाडीवर राहण्याची शक्यता असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

हेही वाचा: Satara ZP Election : जयकुमार गोरे, शिवेंद्रराजेंच्या राजकीय खेळीला यश; साताऱ्यात कमळ फुललं

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number