नगरमध्ये अग्नितांडवाचे अकरा बळी

  अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागल्यामुळे संपूर्ण अतिदक्षता विभाग भस्मसात झाले आहे. या भीषण आगीत ११ जणांचा मृत्यू झाल्याची तसेच काही रुग्ण जळल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वजण ५० ते ८५ या वयोगटातील […]

नगरमध्ये अग्नितांडवाचे अकरा बळी

  अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागल्यामुळे संपूर्ण अतिदक्षता विभाग भस्मसात झाले आहे. या भीषण आगीत ११ जणांचा मृत्यू झाल्याची तसेच काही रुग्ण जळल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वजण ५० ते ८५ या वयोगटातील होते.

  अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत ११ जणांचा मृत्यू झाला असून संपूर्ण अतिदक्षता विभाग जळून खाक झाले आहे. रुग्णालयाला आग लागत्याक्षणीच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे, कॅम्प पोलीस ठाण्याचे शिशिरकुमार देशमुख घटनास्थळी दाखल झाले.

  महापालिकेचे अग्निशमन दल आणि एसआयडीसीचे अग्निशमन दल यांनी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत ११ बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या आगीत भाजलेल्या रुग्णांना तातडीने दुसऱ्या कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यातील काही रुग्ण अत्यंत गंभीर अवस्थेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number