‘निवडणूक आयोगाचा न्याय नसून सौदा’

धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे. त्यानंतर बऱ्याच राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यातच ‘तो न्याय नाही तो एक सौदा आहे’; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राऊतांचे गंभीर आरोप’जो पक्ष आणि नेता नगरसेवकांना विकत घेण्यासाठी ५० लाख आणि १ कोटी रूपये देतो, जो नेता आमदारांना विकत घेण्यासाठी ५० कोटी देतो आणि […]

‘निवडणूक आयोगाचा न्याय नसून सौदा’

धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे. त्यानंतर बऱ्याच राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यातच ‘तो न्याय नाही तो एक सौदा आहे’; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राऊतांचे गंभीर आरोप’जो पक्ष आणि नेता नगरसेवकांना विकत घेण्यासाठी ५० लाख आणि १ कोटी रूपये देतो, जो नेता आमदारांना विकत घेण्यासाठी ५० कोटी देतो आणि खासदारांना विकत घेण्यासाठी १०० कोटी देतो त्याने निर्णय विकत घेणं सोपं आहेच. त्या नेत्याने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह मिळवण्यासाठी आत्तापर्यंत २ हजार कोटींचं डील केलं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. किती मोठं डील झालं आहे हे समजून घ्यायचं असेल तर १०० ऑडिटर्स लावावे लागतील. जो निर्णय आला आहे तो न्याय नाही तो फक्त एक सौदा आहे’ असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

हा हिशोब करण्यासाठी १०० ऑडिटर लागतील. हा न्याय नाही. हे डील आहे. हा सौदा आहे. २००० कोटी खर्च झाले. चिन्ह आणि पक्षाचं नाव विकत घेण्यासाठी किमान दोन हजार कोटी खर्च केल्याची माहिती त्यांच्या बिल्डरांनी मला दिली आहे. ते कुठे बसलेत ते सर्वांना माहीत आहे. आतापर्यंत दोन हजार कोटी खर्च झाले आहेत. मी माझ्या मतावर ठाम आहे, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी ट्विट करूनही ही गोष्ट उघड केली आहे. माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे.. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील.. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number