जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
एकवीरा देवीच्या कळसाच्या चोरीचा तपास 25 तारखेपर्यंत न लागल्यास, सीआयडीने तपास करा असे आदेश गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी दिलेत.
तसेच मंदीराच्या विश्वस्तांना वाळीत टाकणार्यांवर त्वरीत गुन्हा दाखल करण्याचे आदेश गृह राज्य मंत्री दिपक केसरकर यांनी विधान परिषदेमध्ये झालेल्या बैठकीत दिलेत.
शिवसेनेच्या विधान परिषद आमदार निलम गोर्हे अधिवेषणाात प्रश्न उपस्थित केला होता. गोर्हे यांनी आपल्या मागणी मध्ये, कळस चोरी ही अत्यंत गंभीर घटना आहे.
त्याचा तपास तातडीने होणे गरजेचे आहे. मंदीराचे विश्वस्तांना दशहतीखाली ठेउन व विलास कुटे यांना वाळीत टाकण्याच्या निंदनीय कृत्याच्या घटऩेची गंभीर दखल सरकारने घ्यावी आणि याविषयी तात्काळ पोलीसांनी तक्रार दाखल करुन दोषी असणारे प्रवीण देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी त्वरीत बैठक घेण्याच्या सुचना दिल्या होत्या.