Eknath Shinde: ‘पैसे न घेता वाहनं सोडा…’, एकनाथ शिंदेंच्या पोलिसांना तात्काळ सूचना, नेमकं काय घडलं?

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. या वाहतूक कोंडीमध्ये सुमारे दोन-तीन तास अडकल्याची घटना समोर आली आहे. दरम्याने याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.  सलग सुट्ट्या आल्याने अनेकांनी फिरण्याचे प्लॅन बनवले.  त्यामुळे पुण्यासह, सातारा, पाचगणी महाबळेश्वरकडे निघाल्याने […]

Eknath Shinde: ‘पैसे न घेता वाहनं सोडा…’, एकनाथ शिंदेंच्या पोलिसांना तात्काळ सूचना, नेमकं काय घडलं?

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. या वाहतूक कोंडीमध्ये सुमारे दोन-तीन तास अडकल्याची घटना समोर आली आहे. दरम्याने याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 

सलग सुट्ट्या आल्याने अनेकांनी फिरण्याचे प्लॅन बनवले.  त्यामुळे पुण्यासह, सातारा, पाचगणी महाबळेश्वरकडे निघाल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज भीषण वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.लोणावळा, खंडाळा घाट आणि बोरघाट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे अनेक प्रवाशांच्या गाड्या रस्त्यातच बंद पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. 

या सर्व प्रकरणाची दखल घेत  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हेलिपॅडवर उतरताच तात्काळ पोलिसांना फोन लावला. टोलनाक्यावरून पैसे न घेता वाहनं सोडण्याच्या सूचना दिल्या. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तब्बल साडेसहा हजार कोटी रुपये खर्च करून 13.5 कि.मी. लांबीचा मिसिंग लिंक बांधलाय. खोपोली एक्झिटजवळील पूल क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मार्गाचे लोकार्पण करण्यात आलं.

 याचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे यातील 23.5 मीटर रुंदीचा बोगदा, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून करण्यात आली आहे. हा बोगदा लोणावळा तलावाच्या चक्क 180 मीटर खालून खोदण्यात आला आहे. दरम्यान मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number