एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील ३९ आमदारांनी बंड पुकारला होता. त्यामुळे शिवसेनेच्या या बंडखोर नाराजीनाट्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २९ जून रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजपाने एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला असून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ […]

एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील ३९ आमदारांनी बंड पुकारला होता. त्यामुळे शिवसेनेच्या या बंडखोर नाराजीनाट्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २९ जून रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजपाने एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला असून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री
पदासाठी घोषणा केली आहे.

दरम्यान, आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
आहे. यावेळी रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, अतुल भातखळकर, आशिष शेलार असे भाजपचे बड़े नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मरण करून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उपस्थितीत नेते मंडळींनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा नावाचा जयजयकार केला.

त्यानंतर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री कोण याबाबत मार्ग मोकळा झाला आहे.
एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री आहेत तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.

दरम्यान, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत शिंदे आणि फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री पद भूषवणारे देवेंद्र फडणवीस जी यांचे
मनःपूर्वक अभिनंदन. हे नवीन सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासहित राज्याच्या विकासाचा गाडादेखील वेगानं पुढे हाकलतील, अशा सदिच्छा व्यक्त करतो.

तसेच, बेसावध राहू नका, जपून पाऊल टाका, असा सल्लाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number