जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे
सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहनांची गर्दी झाली आणि त्यानंतर टोलनाक्यांवरून राजकारणही सुरू झालंय.
सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे मुलुंड टोलनाक्यावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी पिळ्या रेषेबाहेरील वाहनांना टोलमधून वगळण्याचे निर्देश दिले, अन्यथा कारवाई करू, असा इशारा दिलाय. तर दुसरीकडे नवी मुंबईत वाशी टोलनाक्यावर मनसे पोहोचली.
वाहनचालकांना होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी गोंधळ घातला आणि विना टोल गाड्या सोडल्या. पोलिसांनी या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.