जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी राज्य सरकारला पुन्हा घरचा आहेर दिलाय. वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यामुळे जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मृत्यू होत आहेत. त्यामुळे व्हेंटिलेटर अभावी मृत्यू पावणाऱ्या बालकांची जबाबदारी सरकार घेणार का?. असा सवाल एकनाथ खडसेनी गिरीश महाजन यांना केलाय.
जळगावात व्हेंटिलेटर नसल्याने मृत्यू होत आहेत. त्यामुळे एकनाथ खडसेंनी सरकारच्या आरोग्य खात्यावर टिकास्त्र सोडलयं. नुसते शिबिरे भरून लोकांचे जीव वाचत नाही. रुग्णालयात व्हेंटिलेटर नाहीत डॉक्टर नाहीत. जर सोयी देता येत नसतील तर रुग्णालये बंद करा, असे खडसेंनी विधानसभेत म्हटले आहे.