जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी जेलमध्ये असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मिळावा यासाठी भुजबळ समर्थकांनी जोरदार मोहिम सुरु केली आहे. यासाठी भुजबळ समर्थक अनेक राजकीय नेत्यांची भेटी घेत आहेत.
भुजबळ समर्थकांनी आज भाजप नेते एकनाथ खडसेंची भेट घेतली. यावेळी समर्थकांनी खडसेंसोबत चर्चा केली.
काय चाललं आहे हे जनतेच्या लक्षात आलं आहे. भुजबळांवर अन्याय होतोय असे वक्तव्य खडसेंनी यावेळी केले.