मी मुख्यमंत्री होऊ नये यासाठी अनेकांनी उद्योग केले- एकनाथ खडसेंचा भाजप सरकारला घरचा आहेर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षावर शरसंधान केलं आहे.   मी मुख्यमंत्री होऊच नये यासाठी अनेकांनी नसते उद्योग केल्याचा, गौप्यस्फोट खडसेंनी केला आहे. तसंच घाणेरड्या राजकारणाचा आता कंटाळा आला आहे, अशा शब्दांत खडसेंनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली.   जळगावच्या यावल तालुक्यातील एका कार्यक्रमात खडसेंनी आपल्या […]

मी मुख्यमंत्री होऊ नये यासाठी अनेकांनी उद्योग केले- एकनाथ खडसेंचा भाजप सरकारला घरचा आहेर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षावर शरसंधान केलं आहे.

 

मी मुख्यमंत्री होऊच नये यासाठी अनेकांनी नसते उद्योग केल्याचा, गौप्यस्फोट खडसेंनी केला आहे. तसंच घाणेरड्या राजकारणाचा आता कंटाळा आला आहे, अशा शब्दांत खडसेंनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली.

 

जळगावच्या यावल तालुक्यातील एका कार्यक्रमात खडसेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनातही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन खडसेंनी स्वत:च्याच पक्षातील मंत्र्यांना धारेवर धरलं.

 

निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडला आहे, अशा शब्दांत टोला लगावला होता. भोसरी येथील एमआयडीसी प्रकरणी खडसे अडचणीत सापडले असून न्यायाधीश झोटिंग समितीचा ससेमिरा खडसेंच्या मागे लागला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number