सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारकांना महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलसाठी पंपावर रांगा लावणाऱ्या नागरिकांना आता सीएनजीसाठी देखील पायपीट करावी लागणार आहे. नुकतीच सीएनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा सीएनजीच्याही किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. आज, 26 मे पासून सीएनजीचे दर प्रति किलो 2 रुपयांनी वाढून 83.09 रुपये झाले आहेत. यामपळे प्रवासी आणि वाहतूक व्यावसायिकांवरील खर्चात वाढ होणार आहे.
आतापर्यंतची ही चौथी वाढ आहे. इराण आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वभुमीवर पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा जाणवत असताना पेट्रोल आणि डिझेलच्या कितमी देखील वाढवण्यात आल्या. त्यानंतर आता सीएनजीच्या किमतीही वाढ झाल्याने सर्वसामान्यांसाठी हा मोठा फटका आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेला संघर्ष आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' परिसरातील व्यत्ययांमुळे जागतिक ऊर्जा दरात होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्य लोक अडचणीत आलेत.
इराण आणि अमेरिका युद्धामुळे नेहमीच्या वापरातल्या त्याचसोबत स्वयंपाक घरातील देखील खाण्यापिण्याच्या प्रत्येक गोष्टीचा भाव वाढताना दिसत आहे. अशातच इंधन तुटवड्यामुळे आणि वाढत्या खर्चामुळे चालकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होत असल्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.CNG, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे खाजगी वाहन मालक, टॅक्सी चालक आणि सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.