Chhatrapati Sambhajinagar Education : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा, ड्राइव्हर घेतोय मुलांचे वर्ग

छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Education : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा, ड्राइव्हर घेतोय मुलांचे वर्ग

छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा जिल्हा परिषद शाळेत गेल्या सहा महिन्यांपासून एकच शिक्षक आहे, ते ही कधी तरी येतात. कधी हुशार विद्यार्थी, तर कधी त्या शिक्षकांच्या कारचा चालक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याने त्रस्त ग्रामस्थांनी सिल्लोड पंचायत समिती कार्यालयात शाळा भरवली. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील चिंचखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. शिक्षक वारंवार गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, शाळेत कार्यरत असलेल्या बदर या चालक शिक्षकांच्या अनुपस्थितीत त्यांच्या वाहनाचा विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा पाढा काही विद्याथ्यर्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्यासमोर वाचला. या घटनेमुळे शिक्षणाचा दर्जा पूर्णपणे खालावला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number