दिनांक – १८ / १ / २०२३, प्रतिनिधीकडून,
बुधवारी १८ जानेवारी २०२१ रोजी नाशिक येथे शिक्षक भारती मेळाव्यात आमदार कपिल पाटील यांनी सत्यजित तांबेंच्या अपक्ष उमेदवारीवर आपली भूमिका मांडली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेस नेते सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला. ‘सत्यजित तांबे आणि त्यांचं घराणं अभ्यासू आहे, असा सुशिक्षित उमेदवार सभागृहात हवा’, अशी प्रतिक्रिया शिक्षक भारती मेळाव्यात देत आमदार कपिल पाटील यांनी सत्यजित तांबेंच्या अपक्ष उमेदवारीवर आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच ‘सत्यजित तांबे आमचा उमेदवार आहे तो निश्चितपणे निवडून येईल’, असा विश्वासही कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.
एकंदरीतच, सत्यजित तांबे यांना आता शिक्षक भारतीचा पाठिंबा मिळाला आहे, असं स्पष्ट चित्र दिसत आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.