नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरू

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीच्या कोठडीत असलेला दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरने नवाब मलिक यांचे नाव घेतल्यानंतर ईडीचे पथक नवाब मलिकांच्या घरी दाखल झाले. दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ इक्बाल कासकर यांच्याशी संबंधित नवाब मलिकांची ईडी चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची […]

नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरू

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीच्या कोठडीत असलेला दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरने नवाब मलिक यांचे नाव घेतल्यानंतर ईडीचे पथक नवाब मलिकांच्या घरी दाखल झाले.

दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ इक्बाल कासकर यांच्याशी संबंधित नवाब मलिकांची ईडी चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडीकडून कारवाई सुरू आहे. तसेच याप्रकरणी चौकशीसाठी नवाब मलिक यांना ईडीने समन्स बजावले होते.

नवाब मलिक यांच्या भावाला काल ईडीने समन्स पाठवले होते. त्यानंतर आज नवाब मलिक यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास पोहचले. त्यानंतर नवाब मलिक स्वत: ईडी चौकशीसाठी तयारी दर्शवली.

काय आहे प्रकरण?

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काही दिवसांपूर्वी मुंबईसह लगतच्या परिसरात छापेमारी केली होती. तसेच दाऊद इब्राहिमची मुंबईतील मालमत्ता आणि त्यासंबंधित व्यवहार करणारे नेते ईडीच्या रडारवर होते. त्याचसंबंधी आज राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरू आहे.

मलिकांचे दाऊदशी आर्थिक संबंध?

कुर्ल्यातील जमीन खरेदी प्रकरण.

अतिरेक्यांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप.

१९९३ बॉम्बस्फोटातील अतिरेक्यांशी व्यवहार प्रकरण.

कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात खरेदी.

मंत्री पदावर बसून दहशतवाद्यांशी आर्थिक व्यवहार.

आर्थिक व्यवहार केल्याची मालिकांची कबुली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number