जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पीएनबी घोटाळ्याप्रकरणी आरोपी निरव मोदीच्या मालमत्तेवर सीबीआयकडून धाडसत्र सुरुच आहे. वरळीच्या समुद्र महल येथील घरातून सीबीआयने कोट्यावधींची संपत्ती जपत केलीय. निरव मोदीच्या घरातून 10 कोटी रूपयांची एक अंगठी सापडलीय. सीबीआयकडून हिरेजडीत अंगठी सीबीआयने जप्त केलीय.

त्याचबरोबर या धाडीत 1.40 कोटी रुपयांची घड्याळे आणि 10 कोटी रुपयांची हुसैन हेबर, अम्रिता शेरगिल यांची चित्रे जप्त करण्यात आली. सीबीआयच्या या धाडीत एकूण 15 कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.