शरद पवार गटाला मुदतवाढ

नवी दिल्ली, १६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार आणि शरद पवार – सुप्रिया सुळे या दोघांच्या नेतृत्वातील समर्थकांनी दावा केला आहे. दोन्ही गटांनी आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहोत असा दावा केला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने पुढील निर्णय घेण्याआधी शरद पवार – सुप्रिया सुळे गटाला त्यांची बाजू मांडण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. […]

शरद पवार गटाला मुदतवाढ

नवी दिल्ली, १६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार आणि शरद पवार – सुप्रिया सुळे या दोघांच्या नेतृत्वातील समर्थकांनी दावा केला आहे. दोन्ही गटांनी आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहोत असा दावा केला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने पुढील निर्णय घेण्याआधी शरद पवार – सुप्रिया सुळे गटाला त्यांची बाजू मांडण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

कायद्यातील तरतुदीनुसार राजकीय पक्ष आणि निवडणूक चिन्ह या संदर्भातले सर्व निर्णय घेण्याचा घटनात्मक अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. यामुळे अजित पवार आणि शरद पवार – सुप्रिया सुळे या दोघांच्या नेतृत्वातील गटांनी त्यांचा दावा निवडणूक आयोगाकडे सादर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

अजित पवार गटाच्या खासदार आणि आमदारांनी त्यांची प्रतिज्ञापत्रे पाठवली आहेत. पण शरद पवार – सुप्रिया सुळे गटाने त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ मागितली. निवडणूक आयोगाने ही मुदतवाढ दिली आहे. आता शरद पवार – सुप्रिया सुळे गटाला ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत त्यांचे म्हणणे निवडणूक आयोगाला सादर करायचे आहे. यानंतर निवडणूक आयोग पुढील निर्णय घेणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number