फळे खाणे आरोग्यसाठी खूप फायदेशीर असते. त्यातही पपईमध्ये ऊर्जा, चरबी, फायबर, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक, मॅंगनीज, तांबे, सेलेनियम, जीवनसत्त्वे यांसह अनेक पोषक तत्वे असतात. त्यामुळे आपल्या आहारात पपईचा समावेश हा असावाच. पपईत अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे पपई शरीरात फ्री रॅडिकल्स होण्यापासून रोखते, त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. परंतु कोणतीही गोष्ट अति प्रमाणात झाली कि त्यापासून आपल्याला धोका निर्माण होतो. अगदी तसेच पपईचे फायदे तर आहेतच पण तितकेच तोटेही आहेत. गर्भवती महिलांसाठीही याचे सेवन धोकादायक मानले जाते.
1) ॲलर्जी असल्यास
एका अहवालानुसार कधी कधी पपईमुळे लोकांना ॲलर्जी होऊ शकते. त्यामुळे सूज येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ उठणे अशा समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे पपई खाल्ल्यानंतर मळमळ किंवा चक्कर आल्यास पपई खाऊ नये.
2) गरोदर महिलांनी चुकूनही करू नये सेवन
गरोदरपणात चुकूनही पपईचे सेवन करू नये. कच्च्या पपईमध्ये लेटक्सचे प्रमाण जास्त असल्याने गर्भाशयाच्या भिंतीमध्ये आकुंचन वाढू शकते. तसेच पपईमध्ये असलेले पपेन शरीरातील पेशींच्या पडद्याचे नुकसान करते.याने गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्यास नुकसान होते. यामुळेच गर्भवती महिलांना कच्ची पपई खाणे टाळावे.
3) उलटी होत असेल तर
पपई खाल्ल्याने बऱ्याच वेळा मळमळ आणि उलट्या झाल्यास. ते खाणे टाळावे अथवा जे जास्त प्रमाणात खाल्ल्यास अन्ननलिकेचे नुकसान होऊ शकते
4) पचनाची समस्या
पपई साधारणपणे पचनासाठी खूप चांगली मानली जातात.पण पपईमध्ये भरपूर फायबर असते. त्याने जरी बद्धकोष्ठतेची समस्या होत असली तरी पचन कधी कधी बिघडू शकते. तर कधी अतिसार देखील होऊ शकतो. त्यामुळे पपईचे जास्त सेवन करू नये.