भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरसंदर्भात आरोप केले आहेत. वर्षाकाठी लाखभर रुपयांचे उत्पन्न असलेल्या एका व्यक्तीला कोविड सेंटरचे शंभर कोटी रुपयांच्या कंत्राटाचा लाभ देण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
यावेळी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पुण्यातील कंत्राट मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील चहावाल्याला दिल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तसेच लाईफलाईन ही शिवसेना खासदार संजय राऊत यांची बेनामी कंपनी असून लाइफलाइन कंपनीसाठी सर्व नियम धाब्यावर आणले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट चहावाल्याला दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. याप्रकरणी सोमय्यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयासमोरील एका हॉटेलला भेट देत अनके दावे केले आहेत. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे १०० कोटींचे कंत्राट मुंबईतील सह्याद्री हॉटेल मालकाला देण्यात आहे. राजीव साळुंखे हाच कोविड सेंटर घोटाळ्याचा लाभार्थी आहे. साळुखे यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये इतके आहे. तर साळुंखे हे लाईफलाईन कंपनीत भागीदार असल्याचा किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच स्वत:चा दावा खरा ठरवण्यासाठी काही कागदपत्रे सादर केली.