रब्बी हंगामातील ई – पीक पाहणी राज्यस्तरावर 15डिसेंबर पासून सुरुवात करण्यात आली होती.आता रब्बी हंगामातील ई – पीक पाहणी करण्यासाठी उरले अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. याबद्दलची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.
राज्यात सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. आतापर्यंत 55 टक्के पिक पाहाणी झाली आहे. मात्र आता याबद्दलची नोंद ॲग्री स्टॅकवर येणे, डिजिटल क्राॅससर्वे्हेवर होणे बंद झाले आहे. त्यामुळे आता ई-पीक पाहाणीसाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. ही मुदत वाढवून आता 31 मार्च 2026 करण्यात आली आहे. त्यामुळे त्वरीत शेतकऱ्यांनी ई पिक पाहाणी करून घ्यावी अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. याबद्दलचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
हेही वाचा – Namo Shetkari Yojana: पीएम किसान योजने पाठोपाठ आता नमो शेतकरीचाही हप्ता होणार जमा; 1774 कोटींचा निधी मंजूर
ई-पीक पाहणीचे न करण्यामळे काय नुकसान होणार?
1. सातबारा कोरा राहणार : पिकांची नोंदणी होणार नाही, ज्यामुळे पिकांची खरी माहिती राहणार नाही.
2. पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता : पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळण्यात मोठी अडचण येऊ शकते.
3. कर्ज मिळण्यात अडचणी: शेती कर्ज किंवा पीक कर्ज घेण्यासाठी पिकांची नोंद आवश्यक असते.
4. शासकीय मदत/अनुदान न मिळणे: नैसर्गिक आपत्तीवेळी मिळणारी मदत किंवा अन्य सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही.
हमीभाव मिळण्यात अडचण: विक्रीसाठी सरकारी केंद्रावर मालाची नोंदणी करताना पिकाची माहिती हवी असते.