Dysp Vaishnavi Patil Accident: कोल्हापूर ACB च्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात; दोन सहकाऱ्यांचा जागीच मृत्यू

या धडकेत कारचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून अपघाताची तीव्रता अत्यंत गंभीर होती.

Dysp Vaishnavi Patil Accident: कोल्हापूर ACB च्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात; दोन सहकाऱ्यांचा जागीच मृत्यू

कर्नाटक: कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) वैष्णवी पाटील यांच्या कारचा कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बेंगळुरूहून कोल्हापूरकडे परत येत असताना हा अपघात घडला. महामार्गावर पहाटेच्या सुमारास त्यांच्या कारने एका मालवाहू ट्रकला जोरदार धडक दिली.

या धडकेत कारचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून अपघाताची तीव्रता अत्यंत गंभीर होती. या दुर्घटनेत DYSP वैष्णवी पाटील यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: BMC Election 2026: "तारुण्यात पक्षासाठी रक्त सांडलं, पण आज…" ठाकरेंवरील आरोपानंतर दगडू सकपाळांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश

अपघातात DYSP वैष्णवी पाटील यांच्यासह अन्य तीन जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्या धोक्याबाहेर आहेत आणि उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत.

दरम्यान, अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली तसेच अपघातग्रस्त वाहन हटवण्याची कारवाई केली. मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, वाहनांचा वेग आणि चालकाची परिस्थिती या सर्व बाबींचा तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: Gopichand Padalkar: 'अजित पवारांची छाती फाडली तर ढापलेले…'; गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना डिवचले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number