जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आज मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 7 डबे रूळावरून घसरले. आसनगाव-वासिंद रेल्वे
स्थानकादरम्यान पोल नं ८३/५, १३ जवळ हा अपघात झाला. यात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. भूस्खलनामुळे डबे घसरल्याचे रेल्वे
प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे कल्याण-कसारा दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. अपघातात अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष बस सोडण्यात य़ेणार असल्याची माहिती रेल्वेप्रशासनाने दिली आहे.
पंचवटी एक्सप्रेस व राज्यराणी एक्स्प्रेस या ईगतपुरीवरुन मनमाडला रिटर्न जाण्याची शक्यता आहे, तसेच मनमाड-
गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
अपघातामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाल्या आहेत. मनमाड स्थानकात जनशताब्दी एक्स्प्रेस थांबवण्यात आली आहे. सेवाग्राम
एक्स्प्रेस, वाराणसी एक्स्प्रेस, पुणे-भुसावल हुतात्मा एक्स्प्रेस या गाड्या देखील तात्काळ थांबवण्यात आलेल्या आहेत.
मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी हेल्पलाईन नं.
कल्याण – 2311499
ठाणे- 24114833
नागपूर- 2564342
दादर – 24114836