शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौडीत धावल्या मुली-महिला

श्री दुर्गामाता दौडीत धावल्या रणरागिणी, महिला मुलींनीही घेतला दौडीत सहभाग, दुर्गामाता दौडीतही महिला मुली धावल्या. सांगलीत सुरू असणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीत रणरागिणींचा मोठा उत्साह आणि सहभाग दिसून येत आहे. या दुर्गामाता दौडीत महिला आणि मुलीं आणि तरुणींनीही सहभाग घेतला. त्यामुळे दुर्गामाता दौडीत सहभागी महिला मुली समाजासाठी आदर्श ठरल्या आहेत. दररोज पहाटे साडेपाच […]

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौडीत धावल्या मुली-महिला

श्री दुर्गामाता दौडीत धावल्या रणरागिणी, महिला मुलींनीही घेतला दौडीत सहभाग, दुर्गामाता दौडीतही महिला मुली धावल्या.

सांगलीत सुरू असणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीत रणरागिणींचा मोठा उत्साह आणि सहभाग दिसून येत आहे. या दुर्गामाता दौडीत महिला आणि मुलीं आणि तरुणींनीही सहभाग घेतला. त्यामुळे दुर्गामाता दौडीत सहभागी महिला मुली समाजासाठी आदर्श ठरल्या आहेत.

दररोज पहाटे साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून श्री दुर्गामाता दौड सुरू होते. त्यानंतर संपूर्ण सांगली शहारातील नियोजित मार्गावरून फिरून या दौडीची सांगता पुन्हा शिवतीर्थावर केली जाते. दौडीच्या इतिहासात काहीही महिला मुली या दौडीत सहभागी होत नसायच्या मात्र गेल्या काही वर्षांपासून धर्मप्रेमी मुली आणि महिलासुद्धा या दौडीत उत्साहाने सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. सांगलीत 35 व्या वर्षी सुरू असणाऱ्या दुर्गामाता दौडीत महिला आणि मुलींचा सहभाग प्रेरणादायी ठरत आहे. डोक्यावर फेटा आणि कमरेला शेला बांधून तसेच कपाळावर भगवा टिळा लावून या दुर्गेच्या लेकी शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीत हिरीरीने सहभाग दर्शवत आहेत.

विशेष म्हणजे संपूर्ण दौड संपेपर्यंत या मुली दौडीत सहभागी असतात याबाबत त्यांनी आम्हाला दौडीमुळे आणि गुरुजींच्या विचार आणि सल्ल्यामुळे उत्साह आणि नवी दिशा व प्रेरणा मिळते अशी प्रतिक्रिया दौडीत सहभागी एका तरुणीने दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number