मुंबईत मागच्या काही दिवसांपासून पावसाला सुरु आहे. अशातच आज सकाळपासून सुरु असलेल्या पावसाचा फटका पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. 8 ते 10 या ऑफिस टाईममध्ये पश्चिम रेल्वेवरील लोकल उशिराने धावत आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरात पाऊसाला सकाळपासून सुरुवात झाली असून पावसामुळे कामाला जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पावसाचा फटका पश्चिम रेल्वेवर बसला असून पश्चिम रेल्वेवरील लोकल 8 ते 10 मिनिट उशिराने धावत आहे.
लोकल सेवा मुंबईची जीवनवाहिनी म्हटली जाते. दररोज लाखो लोक मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरुन प्रवास करतात. त्यामुळे मुंबईचा वेग मोठ्या प्रमाणात लोकल सेवेवर अवलंबून आहे. अशातच आज सतत सुरु असलेल्या पावसाचा या लोकल सेवेला फटका बसला आहे. शहर आणि उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यात आधीच रस्त्यावरील वाहतूककोंडीचा सामना करून रेल्वे स्थानक गाठलेल्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकाचा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
जून महिना संपत आला तरी पाऊस येत नाही अशी जी नागरिकांची अपेक्षा होती अखेर पावसाने सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा आवाज ऐकलेला आहे आणि पाऊस जोरदारपणे पडायला लागलेला आहे मुंबईसह उपनगरात आज सकाळी 9 वाजल्यापासुनच आपली हजेरी लावली आहे. कडक उन्हाळा झेल्ल्यानंतर आता कल्यानकर कुठे तरी सुखावला आहे.