विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भोसरी येथे भाजप आमदाराने गुजरातीमध्ये फ्लेक्स लावल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजप आमदाराच्या हा वाद लक्षात येताच त्याने एका रात्रीत फ्लेक्स हटवले आहेत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी भाजपचे आमदाक महेश लांडगे यांनी फ्लेक्स लावले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजराती असल्यामुळे गुजरातीत फ्लेक्स लावल्याचे सोशल मीडियावर म्हटलं जात आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी गुजरातीत फ्लेक्स लावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे असल्यामुळे गुजराती भाषेत फ्लेक्स लावले असल्याची चर्चा सुरू आहे.
भाषेवरून वाद पेटत असल्याचे लक्षात येताच महेश लांडगे यांनी आचारसंहिताचे नाव पुढे करत एका रात्रीत फ्लेक्स हटवले आहेत.
यासंदर्भात भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी बोलणं टाळ असून विरोधकांना केवळ गुजराती भाषेतील फ्लेक्स दिसले.
देशातील 28 भाषेत फ्लेक्स लावल्याचं दिसलं नसल्याचे आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी माहिती दिली आहे.