जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
अहमदनगरमध्ये लहान मुलांना आणि दिव्यांग व्यक्ती याना पळवून नेऊन त्यांना भीक मागायला लावणारी घटना समोर आली आहे.
बीड जिल्हयातील परळी येथे राहणार सर्वसाधारण घरातील १८ वर्षीय दिव्यांग युवक जुबेर शेख हा परभणीला रेल्वे ने जात असताना त्याला काही परप्रान्तीय टोळी ने पळवून नेले. तो घरातून गायब झाला असल्याची आणि त्याचा काही थांगपत्ता लागत नसल्याने जुबेर च्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली व जुबेर हरवला असल्याची तक्रार नोंदवली.
25 जुलै 2017 रोजी सकाळी 10 वाजता घरातून बाहेर गेला व परत आलाच नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरु केला मात्र इकडे जुबेरला परप्रांतीय टोळीने थेट बिहार ला नेले आणि त्याला भीक मागणायचे प्रशिक्षण दिले पुढे त्याची रवानगी भीक मागण्यासाठी केली.
जुबेर हा पायाने अधू आणि भोळसर असल्याने त्याला एका दिव्यांगांच्या खूर्चीवर बसवले आणि त्याला भीक मागयला लावले. दिव्यांग खूर्चीवर एक भोंगा, बॅटरी, माईक, लावेल होती त्याच्यासहास्याने जुबेर नागरिकांकडून भीक मागितली होती.
भीक मागण्यास नकार दिला असता त्याला चटके आणि मारहाण केली जाई, असे जुबेरने सांगितले. सुदैवाने या मधील तीनही परप्रांतीय नागरिकांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. नागरिकांच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेने पकडली गेली आहे . मात्र, या मागे मोठी चैन आहे हे निश्चित आहे.
जुबेरने दिलेल्या माहितीनुसार एक महिला सुद्धा त्याच्या बरोबर होती रोज मटण मासे खायला असून देखील भीक मागणाऱ्या मुलांना जेवण देत नसत. त्यातही घरी जाण्याचे नाव काढले तर मारहाण केली जात असे, असेही जुबेर सांगितले.
जुबेर हा चांगल्या घरचा असून भोळसर असल्याने त्या गोष्टीचा फायदा या टोळीने घेतला. दरम्यान, नागरिकांची सतर्कता महत्वाची आहे, नागरिकंनी जर सतर्कता बाळगली तर नक्कीच अपहरणाचे हे प्रकार नक्की थांबतील.