DSK आणि त्यांच्या पत्नी चौकशीसाठी हजर; कुलकर्णी यांच्या मालमत्तेच्या लीलावाची प्रक्रीया सुरू

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   हजारो गुंतवणूकदारांचे पैसे थकवलेले  बांधकाम व्यवसाईक डी .एस . कुलकर्णी हे त्यांच्या पत्नी हेमंती यांच्यासह आज चौकशीसाठी पुणे  पोलिसांसमोर हजर झाले . डी .एस . कुलकर्णींच्या मालमत्तांचा लीलाव करण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सुरु केलीय. त्यासाठी डी .एस .के. आणि त्यांच्या पत्नींना पुणे पोलीस आयुक्तालयात बोलवण्यात आलं होत. पोलिसांनाही […]

DSK आणि त्यांच्या पत्नी चौकशीसाठी हजर; कुलकर्णी यांच्या मालमत्तेच्या लीलावाची प्रक्रीया सुरू

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

हजारो गुंतवणूकदारांचे पैसे थकवलेले  बांधकाम व्यवसाईक डी .एस . कुलकर्णी हे त्यांच्या पत्नी हेमंती यांच्यासह आज चौकशीसाठी पुणे  पोलिसांसमोर हजर झाले . डी .एस . कुलकर्णींच्या मालमत्तांचा लीलाव करण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सुरु केलीय.

त्यासाठी डी .एस .के. आणि त्यांच्या पत्नींना पुणे पोलीस आयुक्तालयात बोलवण्यात आलं होत. पोलिसांनाही दोन तास डी एस .के आणि त्यांच्या पत्नींची चौकशी केली . डी एस केंच्या तीनशेपेक्षा जास्त मालमत्ता आहेत.

या मालमत्तांचा अहवाल पोलिसांकडून पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलाय. जिल्हाधिकाऱ्यांकडून तो राज्य सरकारला पाठवला जाईल आणि त्यानंतर राज्यसरकार त्या मालमत्तांचा लीलाव करण्याबाबतचे नोटिफिकेशन काढेल.

मात्र, डी एस केंच्या सर्व मालमत्तांवर बँकांची कर्जं असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे डी एस कें च्या  मालमत्ता विकल्या तरी त्यातून उभा राहणाऱ्या पैशातून आधी बँकांची  कर्जं भागवली जातील आणि त्यानंतर पैसे शिल्लक राहिले तर ते गुंतवणूकदारांमध्ये वाटले जातील असं पोलिसांनी म्हटलंय.

त्यामुळे डी एस केंच्या गुंतवणूकदारांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने डी एस केंना आतापर्यंत आधी  गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याच्या बोलीवर अटकपूर्व जमीन वाढवून दिलाय. मात्र, आश्चर्य म्हणजे त्याचा फायदा गुंतवणूकदारांना होण्याऐवजी बँकांची होणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number