काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक यांनी परळ बसस्थानक आगारात अचानक भेट दिली होती. यावेळी त्यांना मद्यधुंद अवस्थेत असलेला वाहक निदर्शनास आला होता. त्यानंतर लगेचच या प्रकरणाची दखल घेत संबंधित वाहकाला निलंबित केलं होतं. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अशा चालक आणि वाहकांविरूद्ध कारवाई केली जाईल असे जारी करण्यात आले होते. मात्र या नियमांना कर्मचाऱ्यांनीच केराची सुपली दाखवल्याचे निदर्शनास आले आहे.
रायगड जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मध्यधुंद अवस्थेत कामावर असलेला कंडक्टर आढळून आला. त्याला प्रवाशांना धड तिकटही देता येत नव्हतं. यामळे गाडीत गोंधळ आणि अपशब्दांचा भडीमारही होत असल्याचा दिसून येत आहे. हा व्हिडीओ समाज माध्यमांवर सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ रायगड जिल्ह्यातील पोलादपुर तालुक्यातील पोलादपुर गोलधरा बसमधील आहे. मद्यधुंद अवस्थेतील या कंडक्टरमुळे प्रवासी आणि बस चालकाला प्रचंड त्रास सहन करावा लागला. सदर चालकावर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे.