वृत्तसंस्था, मुंबई
भारतीय तटरक्षक दलाने मुंबईतील समुद्र किनारी तब्बल 3500 कोटींचं ड्रग्ज पकडले. जहाजमार्गे होणाऱ्या मोठ्या ड्रग्ज तस्करीचा डाव उधळून लावण्यात भारतीय
तटरक्षक दलाला यश आले.
या ड्रग्जची किंमत तब्बल 3 हजार 500 कोटी एवढी आहे. एमव्ही हेनरी या जहाजात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले. तीन दिवसांपूर्वी गुप्तचर संघटनेकडून
भारतीय नौदलाला या जहाजासंबंधी माहिती मिळाली होती. त्यानंतर तटरक्षक दलाने छापा टाकत ड्रग्ज जप्त केले.
ड्रग्ज पकडण्याची ही कारवाई आतापर्यंत देशातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.